“अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?”आण्णांच्या ‘जेलभरो आंदोलना’वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवावर राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दहीहंडी साजरी करण्यावरुन मनसे आणि भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.या निर्बंधांमुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. यात ते बोलत होते.

या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांनी बोचरी प्रतिक्रिया दिली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दीर्घ काळापासून बंद असलेली राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी सध्या एकीकडे राज्यातील विरोधी पक्ष चांगला आक्रमक होत असताना पाहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे काहीच दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांनी देखील याचबाबत राज्य सरकारला मंदिरं उघडण्याचा इशारा दिला होता. याविषयी एका पत्रकाराने राज ठाकरे यांची प्रतिक्रिया विचारली असता “अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?” असा उलट सवाल राज यांनी केला आहे. त्याचसोबत राज ठाकरे यांनी या प्रकरणी शिवसेनेपासून भाजपपर्यंत सर्वांवरच टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा