काँग्रेसने शिवसेनेसोबत युती केली तेव्हा विचारसरणी कुठे होती? जितीन प्रसाद यांचा काँग्रेसवर निशाणा

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारीने वेग घेतला आहे. काँग्रेस सुस्त पडलेली असताना भाजपने मुख्यमंत्र्यांपासून आमदारांच्या कामाचा आढावा आणि मतदारसंघातील वातावरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर काल भाजपने काँग्रेसला जोरदार झटका देण्याची मोठी तयारी केली आहे. काँग्रेसचा मोठा चेहरा असलेले जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे.

यानंतर यावरून आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी जितीन प्रसाद यांनी विचारसरणी बाजूला ठेवून भाजपात प्रवेश केल्याची टीका काँग्रसेचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केली होती. यावर जितीन प्रसाद यांनी पलटवार केला असून शिवसेनेसोबत युती केली तेव्हा नेमकी पक्षाची विचारसरणी काय होती? असा सवाल त्यांनी कपिल सिब्बल यांना विचारला आहे.

काँग्रेसने शिवसेनेसोबत युती केली तेव्हा विचारसरणी कुठे होती? पश्चिम बंगालमध्ये डाव्यांसोबत गेले तेव्हा काय विचारसरणी होती? आणि त्याच वेळेला ते केरळमध्ये डाव्यांसोबत लढत होते,” असं सांगत जितीन प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीविरोधात वक्तव्यं केल्याने पक्षाचं नशीब बदलणार नाही असा टोलाही यावेळी त्यांनी सिब्बल यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा