“सव्वा रुपया असो किंवा सव्वा कोटी मुद्दा पैशांचा नाही, स्वाभिमानाचा आहे”

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहे. कारण पाटलांची लायकी कोट्यवधी रुपयांची नाही. त्यांची किंमतच केवळ सव्वा रुपया आहे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी तिखट शब्दांत पाटलांवर पलटवार केला आहे. तर यावरच चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

’संजय राऊत माझ्यावर सव्वा रुपयांची मानाहानी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. ते माझे मित्रं आहेत. त्यामुळे त्यांना मी एकच सूचवेन की, त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी. कारण राऊतांची मानहानी निश्चितच सव्वा रुपयांची नाही, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. यानंतर आता यावर पुन्हा एकदा राऊतांनी प्रतिक्रिया दिलीय.

आत्मसन्मानाची गोष्ट असते, त्यामुळे किंमत काही असो तुमच्याकडे सव्वा रुपया, सव्वा कोटी, भरपूर पैसे असतील त्या पैशांवर आमचं घर चालणार नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. स्वाभिमान आणि सन्मानाला किंमत नसते, मग तो एक हजार कोटींचा असो किंवा सव्वा रुपयांचा. प्रश्न स्वाभिमानाचा आहे, त्यामुळे किंमत वाढवून घ्या, या चंद्रकांत पाटलांच्या मागणीला काहीच अर्थ नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा