“कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडताय…”; तुमचा हा बेशरमापणा जनता कधीच विसरणार नाही !

मुंबई : मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. कोकणात तर पावसाचा हाहाकार सुरू आहे. चिपळूण आणि खेड शहर पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. एनडीआरएफचं एक पथक चिपळूणमध्ये दाखल झालं असून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे.

चिपळूणमध्ये 2005 नंतर भीषणपरिस्थिती उद्भवली आहे. वशिष्ठी,शिव नदीला पूर आला आहे. खेडमध्येही जगबुडी नदीला महापूर आला आहे. तर, अनेक गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. अतिशय भयावह स्थिती त्याठिकाणी उद्भवली आहे. चिपळूणमध्ये मदतकार्याला सुरुवात झालीय. घरांमध्ये अडकलल्या नागरिकांना बोटीनं बाहेर काढण्यात येतंय.

राज्यात अशी पूरस्थिती असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षांनी पोस्ट केलेल्या फोटोमुळे आत राज्यभर संताप व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष असणाऱ्या फौजीया खान यांनी ईदनिमित्त आपल्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद वापर, खासदार श्रीनिवास पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, वंदना चव्हाण आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. या सर्वांसोबतचा फोटो काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फौजीया यांनी ट्विट केला.यावर आता टीका होऊ लागली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजप आमदार अतुल भातखळकर हे अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. “कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडताय…”; ईद पार्टीमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा फोटो व्हायरल झाले आहेत. इतके संवेदनाहीन, निबर राज्यकर्ते महाराष्ट्राला लाभणे हे राज्याचे दुर्दैव आहे. तुमचा हा बेशरमापणा राज्यातील जनता कधीच विसरणार नाही असं भातखळकर यांनी म्हटले आहे.

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा