कोण आहेत राज ठाकरे?; सहगल यांनी राज ठाकरेंना झापलं

ज्येष्ठ लेखिका नयनतारा यांना ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रण देण्यात आलं. पण ते मनसेच्या विरोधामुळे मागे घ्यावं लागल्याची चर्चा आहे. यावर मनसेकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलंय. नयनतारा सहगल यांनी महाराष्ट्रात जरुर यावं, त्यांचं स्वागत आहे, असं मनसेने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय. यावर आता टीव्ही ९ मराठीशी बोलताना सहगल यांनी राज ठाकरे यांना चांगलंच झापलं आहे.

“राज ठाकरे कोण आहेत, जे कुठल्याही भारतीय नागरिकाला हे म्हणतील की, मी तुम्हाला परवानगी देतो आहे येण्याची किंवा मी परवानगी नाही देत. जर हा एक स्वतंत्र देश आहे, तर या देशाच्या प्रत्येक नागरिकाला हा हक्क आहे की तो देशात कुठेही जाऊ शकतो. आपले विचार मांडू शकतो”, असे म्हणत नयनतारा सहगल यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या –

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.