‘सत्ता आली तरी तुम्ही आम्ही कोण तर कपबश्या धुणारे’; ठाकरे सरकारमधील मंत्र्यानं दिला घरचा आहेर

जालना : उत्तर महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील दोदडगाव येथे मंडलस्तंभ अभिवादन आणि सामाजिक न्याय मेळाव्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत.या कार्यक्रमाला माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित होते. यावेळी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चौफेर टोलेबाजी केली.

“सत्ता आली तर तुम्ही आम्ही कोण तर कप-बशा धुणारे! चहा पिणारे नाही. त्यांनी खावा मटनाचा रस्सा आणि तुम्हाला भजा! आपण भजांवर खुश. अरे तो मटन खातोय आणि तुम्ही भजांवर खुश. तुम्ही आम्ही कुठे आहोत याचा विचारच आपण करत नाही. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या ताटातील काढायला शिकाल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने ओबीसी हा मजबुतीने उभा झालाय हे चित्र रंगेल, ती ताकद तुम्हा आम्हाला सर्वांना मिळून निर्माण करायची आहे.” असंहि वडेट्टीवार म्हणाले.

ओबीसी समाजासाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे रोज लढताना दिसतात. ते माझं कौतुक देखील करताना दिसतात. मी देखील त्यांचं कौतुक केलं पाहिजे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण मिळून लढू. नाहीतर काय शिवसेना सत्तेत आली तर पहिले मुख्यमंत्री कोण आणि भाजप सत्तेत आली तर पहिले मुख्यमंत्री कोण हे सर्वांनाच माहिती आहे. सत्ता आल्यानंतर पहिल्या बाकावर कोण बसणार हे सर्वांना मााहिती आहे. तेव्हा तुम्ही कुठे आहात?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा