भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील कोणाला मिळालं कोणतं पद? वाचा

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासह अनेकांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळणार असल्याची चर्चा होती. आज याबाबत केंद्रीय भाजपाने या नावांची घोषणा केली आहे.

भाजपाच्या या यादीत महाराष्ट्रातील ८ जणांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने विनोद तावडे, पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. केंद्रीय पातळीवरील या यादीत महाराष्ट्रातल्या खालील नेत्यांना स्थान दिलं आहे.

वी. सतीश – राष्ट्रीय सहसरचिटणीस

विनोद तावडे – राष्ट्रीय सचिव

सुनील देवधर – राष्ट्रीय सचिव

पंकजा मुंडे – राष्ट्रीय सचिव

विजया राहटकर – राष्ट्रीय सचिव

जमाल सिद्धिकी – राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष

संजू वर्मा – राष्ट्रीय प्रवक्ते

खासदार हिना गावित – राष्ट्रीय प्रवक्ते

 

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.