‘कोण अमृता फडणवीस? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था’; पेडणेकरांच टीकास्त्र

पुणे : राज्यातील काही भागांत कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. ज्या शहरात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, तिथे राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. मात्र, पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असूनही राज्य सरकारने पुण्यातले निर्बंध जैसे थे ठेवले आहेत. याच मुद्यावर अमृता फडणवीस यांनी विधान केलं असून पुणेकरांना एक खास सल्लाही दिला होता.

अमृता फडणवीस यांनी आक्षेप घेत पुण्याबाबत सरकारने असा निर्णय का घेतला हे कळत नसल्याचं म्हटलं. त्याचवेळी कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही अमृता फडणवीसांनी पुणेकरांना दिला. धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी अप्रतिम घडवलेल्या वस्तूंच्या महोत्सवाचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन पुण्यनगरीत पार पडलं. यावेळी पुण्याच्या निर्बंधाबाबत असलेल्या पुणेकरांच्या आक्षेपावर बोलताना त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला होता.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य करत अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे,’ असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. पुढे पेडणेकर यांनी, आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही असं म्हणत अधिक बोलणं टाळलं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा