‘प्राण कंठाशी आलेल्या लोकांना वाली कोण?’; सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर कडाडून टीका

मुंबई : देशात सध्या कोरोनाचा जो हाहाकार सुरू आहे तो पाहून सर्वोच्च न्यायालयाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते राजकारणातच गुंतून पडले आहेत. कोरोना संकटाशी मुकाबला करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समितीची स्थापना केली आहे. अशावेळी प्राण कंठाशी आलेल्या लोकांनी करायचे काय? त्यांचा वाली कोण? सर्वोच्च न्यायालयाचे मन द्रवले व त्यांनी कोरोना युद्धासाठी 12 तज्ञांची राष्ट्रीय समिती स्थापन केली. या समितीनेच आता कोसळलेल्या आरोग्य यंत्रणांत प्राण फुंकावा, असा खोचक टोला शिवसेनेनं लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून याबाबतची टीका करण्यात आलेली आहे.

देशात सध्या कोरोनाचा जो हाहाकार सुरू आहे, तो पाहून सर्वोच्च न्यायालयाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते राजकारणातच गुंतून पडले आहेत. आसामच्या मुख्यमंत्रीपदाचा गुंता सोडविण्यात ते मग्न होते. पश्चिम बंगालला ममता यांनी विजय मिळवला असला तरी त्यांचे राज्य त्यांना नीट चालवू द्यायचे नाही. त्यासाठीच्या कारस्थानी कारवायांत वेळ निघून जात आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

कोरोना संकटाशी मुकाबला करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समितीची स्थापना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्सची स्थापना करून केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्काच मारला आहे. प्राण कंठाशी आलेल्या लोकांनी करायचे काय? त्यांचा वाली कोण? सर्वोच्च न्यायालयाचे मन द्रवले व त्यांनी कोरोना युद्धांसाठी 12 तज्ज्ञांची राष्ट्रीय समिती स्थापन केली. या समितीनेच आता कोसळलेल्या आरोग्य यंत्रणांत प्राण फुंकावा, असं देखील या अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा