जनाब संजय राऊत MIM की मोहब्बत कौन? गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

मुंबई : मुसलमान या देशाचे नागरिक आहेत व त्यांनी या देशाचे संविधान पाळूनच आपला मार्ग बनवला पाहिजे, असे सांगण्याची हिंमत ओवेसींमध्ये ज्या दिवशी येईल, त्या दिवशी ओवेसी यांना राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिष्ठा मिळेल, नाहीतर भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल. आज ओवेसींच्या सभांमधून ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे उठत आहेत. त्यामागेही राजकीय सूत्र आहेच.

तसेच फोडा, झोडा आणि विजय मिळवा. ओवेसी यांनाही त्याच विजयाचे सूत्रधार म्हणून वापरले जात आहे. पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपाचे राजकारण पुढे सरकणार नाही का? असा सवाल करत शिवसेनेने रोखठोकमधून टोला लगावला आहे. त्यावरुन गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

ओवैसींना आलिंगन घालून मालेगावच्या सत्तेचा इदीचा नजराणा तुम्ही पेश केला आहे. इतकंच नाहीतर अमरावती मनपातसुद्धा सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली होती. आता ‘जनाब राऊत MIM की मुहब्बत कौन है?’ हे महाराष्ट्राला सांगायची आवश्यकता नाही, असंही पडळकरांनी म्हटलं आहे तसेच हिंदुत्वामुळे निर्माण झालेल्या युतीच्या जीवावर निवडून आले आहेत हे संजय राऊत विसरले असतील असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

योगींनी मुख्यमंत्री बनू नये म्हणून शपथा घेणाऱ्यांना योगीजी बघून घेतील. ते सक्षम आहेत. पण महाराष्ट्रातील हिंदूना शिव्या देणारा शर्जील उस्मानीसारख्या व्यक्तीवर तुम्हाला कारवाई करण्याची हिंमत नाही. अशा भेकड प्रवृत्तींनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा