पुढचा मंत्री कोण?; किरीट सोमय्यांनी थेट नावच घेतलं!

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा सुळसुळाट सुरु आहे. राज्यातील महाविकासाघडी सरकारमधील अनेक दिग्गज नेत्यावर ईडीने कारवाई केली आहे. तसेच भाजपचे फायरब्रॅन्ड नेते किरीट सोमय्या हे नेहमी महाविकासाआघाडीला कैचीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच महाविकास आघाडीतील कोणत्या नेत्यावर ईडी कारवाई करणार याच भाकीत सोमय्या हे आधीच करत असतात.

यावेळी आता आणखी एका मंत्र्याचा घोटाळा उघडकीस आणण्याचा इशारा दिला आहे. येत्या शुक्रवारी पुण्यात जाणार असून, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात हा दौरा असेल, असे त्यांनी थेट सांगितलं. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सोमय्यांनी त्यांनी इशारा दिला आहे. तसेच हे सरकार ५० वर्षे चालू दे. पण महाराष्ट्राच्या जनतेला लुटणारा माफिया ५० दिवसांत सरळ होणार, असा इशारा सोमय्यांनी दिला.

आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. आता कारवाया आणि न्यायालयीन आदेशाला गती आली आहे. पुढील ५० दिवसांत ‘डर्टी डझन’ एकतर जेल, बेल किंवा रुग्णालयात असतील. महाराष्ट्राला घोटाळामुक्त करणे हे आमचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच मला आशा आहे की, यशवंत जाधव यांनी मातोश्रीला दिलेले 50 लाखांचे बिल आणि त्यावरील भरलेला जीएसटी अजित पवारांनी पाहिला असेल, असं म्हणत अजित पवारांनाही लक्ष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा