कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी?, ‘या’ दोन नावांची चर्चा!

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या आठ दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ते उपचार घेत आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही त्यांना काही दिवस आराम करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार की नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे दिला जाणार याबाबतची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ते रिलायन्स हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपीचे उपचार घेत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज दिल्यानंतरही त्यांना किमान दोन महिने आराम करावा लागणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाचा भार कुणाकडे जाणार याबाबतची सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत राज्याचा तात्पुरता कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार की शिवसेनेनेचे दिग्गज नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा