पाच वर्षात राज्याची वाट लावणारा मुख्यमंत्री कोण असेल तर ते फडणवीस; काँग्रेसचं टीकास्त्र

उल्हासनगर : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. सोयाबीन, कापूस, मका ही हाताशी आलेली पिकं उद्ध्वस्त झाली. अजूनही अनेक शेतं पाण्याखाली आहेत. पंचनामे सुरू आहेत. आता शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी या भागाची नुकसान पाहणी केली. दरम्यान आता दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले होते.

आज उल्हासनगर महानगरपालिका निवडणूका जवळ येत असताना, काँग्रेस पक्षातर्फे आज उल्हासनगर मध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी ‘मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत आहे कारण जनता मला तेवढं प्रेम देत आहे’. असं वक्तव्य केलं होत. याच मुद्द्यावरून जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली.

गेल्या पाच वर्षात राज्याची वाट लावणारा मुख्यमंत्री कोण असेल तर ते फडणवीस आहेत, या तिखट शब्दात भाई जगताप यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. कधी झालं नसेल येवढं नुकसान फडणवीस यांच्या काळात झाल्याचंही जगताप म्हणाले आहेत. फडणवीस यांनी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काहीच केलं नाही, असंही जगताप म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा