“मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी ही कोणाची जबाबदारी?”,चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई : मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आहे.मुंबईत 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेने केलेला असतानाच रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं मध्य आणि हार्बर रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे. यावरून भाजपने मुंबई महानगरपालिका तसेच ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरवरून निशाणा साधला आहे. ‘पावसाच्या येता सरी…मुंबई पाण्याने भरी…मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी ‘ही’ कुणाची जबाबदारी ?, असा टोला चित्र वाघ यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

“मुंबई महानगरपालिकेने आज मुंबई तुंबवून दाखवली आहे. मुंबईतील नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आम्ही आधीपासून सांगत होतो. ती बाब आता आज उघड झाली आहे. आता राज्य सरकारकडून पावसाची जबाबदारीही आता बहुतेक मोदींवर ढकलली जाईल. आता मोदींनीच त्यातून मार्ग काढावा असं राज्य सरकारने म्हणू नये अशी आमची अपेक्षा आहे,” असा अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला आणि मुंबई महानगरपालिकेला टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा