बहिण आणि मेहूण्याच्या भांडणात सलमान खान कोणाची बाजू घेतो?

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान सध्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचला होता. यावेळी ते कपिलसोबत मस्ती करताना दिसले आहेत. यावेळी कपिलने सलमानला त्याच्या आणि आयुषमध्ये असलेल्या नात्याबद्दल एक मजेशीर प्रश्न विचारला आहे.

कपिलने सलमानला विचारले, ‘भाईजान आज तुम्ही दोघेही एकत्र आला आहात. तर सगळ्यांना तुमच्या दोघांमध्ये कसे नाते आहे हे जाणून घ्यायचे आहे’ आणि पुढे म्हणाला ‘जेव्हा अर्पिता आणि आयुषमध्ये भांडण होते तेव्हा सलमान खान कोणाला पाठिंबा देतो?’ यावर आयुषने एक मजेशीर उत्तर दिले, तो म्हणाला की “मला आधी वाटले होते की भाईजान अर्पितालाच पाठिंबा देतील. पण भाई अर्धा तासाच्या संवादात अर्पिताच्या टीममध्ये होते आणि नंतर त्यांनी पूर्व गोष्ट ऐकली आणि माझ्या बाजूने बोलू लागले. आमच्यातलं भांडण तर संपलं होतं पण दोघांपैकी कोण जिंकलं हे समजलं नाही.”

पुढे कपिलने आयुषला प्रश्न केला की कधी अर्पिता म्हणाली, ‘माझ्या भावासाठी मुलगी बघ?’ यावर उत्तर देत आयुष म्हणाला, “जेव्हा आम्ही लग्नाविषयी चर्चा करत होतो तेव्हा मी तिला प्रश्न विचारला होता की, तुमच्या घरात अशी संस्कृती आहे का की आधी मोठ्याचे लग्न होते आणि त्यानंतर लहानांचे?” त्यावर उत्तर देत अर्पिता म्हणाली, “बेटा आपण जर भाईच्या लग्नाची वाट पाहिली तर आपण म्हातारे होऊ. म्हणून आपण लग्न करुया. भाई त्याच त्याच बघेल.”

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा