InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राहुल गांधी यांनी दुसरा मतदारसंघ म्हणून ‘वायनाड’लाच का निवडले?

केरळमध्ये भाजपचे अस्तित्व हे नाहीच्या बरोबरच आहे. येथे डावे आणि काँग्रेस यांच्यामध्ये थेट लढत आहे.  राहुल गांधी यांनी अमेठीबरोबरच केरळमधील वायनाड मतदारसंघाची लोकसभा निवडणूकीसाठी निवड केली आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न आला की वायनाडचीच निवड का ?

मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर २००९च्या लोकसभा निवडणुकीत वायनाड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस उमेदवार एम. आय. शहनवास हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. वायनाड मतदार संघात हिंदूची लोकसंख्या ही ४९ टक्क्यांच्या आसपास आहे. तर मुस्लीम २९ टक्के तर ख्रिश्चन २१ टक्क्यांच्या आसपास आहेत. मुस्लीम आणि ख्रिश्चन एकत्रित लोकसंख्या ही ५० टक्क्य़ांच्या आसपास आहे.

याशिवाय हा मतदार संघ केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांना जोडून आहे, त्यामुळे राहुल गांधी यांनी वायनाडमधून लढल्यास त्याचा परिणाम तामिळनाडू आणि कर्नाटकातील मतदारसंघावर देखील पडू शकतो. यामुळे राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघाची निवड केली.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply