InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पार्थ पवार यांनी राज्यपालांची का भेट घेतली?

पार्थ पवार यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे निवदेनाच्या माध्यमातून त्यांनी लक्ष वेधले. पार्थ पवार यांनी हे निवेदन राज्यपालांकडे सादर केलं.

पुण्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे पार्थ यांची राजकारणातील एण्ट्री मावळ लोकसभा मतदारसंघातून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत काही दिवसांपूर्वी भाष्य केलं होतं. मावळमध्ये मला उभा राहायचंच आहे असं माझं काही नक्की नाही. पुढच्या इलेक्शनला उभा राहिलो तरी चालतंय. माझा एकच मुद्दा आहे की इकडचे मुद्दे समजून घ्यायचे आहेत. लोकांना भेटायचे आहेत, इथे विकास कसा आणायचा त्यापद्धतीने मला काम करायचं आहे”, असं पार्थ पवार म्हणाले.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.