InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

कोथरूडमध्ये मनसे उमेदवाराला पाठिंबा का दिला?; अजित पवारांनी केला खुलासा

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कोथरूडमध्ये मनसे उमेदवाराला पाठिंबा का दिला, यामागचे कारण स्पष्ट केले आहे. पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, ”आमची काँग्रेसशी आघाडी आहे. भाजप-सेनेविरोधात मतविभाजनाचा फटका बसू नये, म्हणून अनेक ठिकाणी वेगळी भूमिका घेतली आहे.

Related Posts

शरद पवार म्हणजे कसलेला गडी; हवेचा रोख बरोबर ओळखतात- नरेंद्र मोदी

Loading...

- Advertisement -

कोथरूडची जागा त्यापैकीच एक आहे. तिथे मनसेला पाठिंबा दिलाय. आजच्या सभेत राज ठाकरे काय आवाहन करतात ते पाहू. गरज भासली तर एकत्रित सभा घेता येतील का यावरही विचार करू.” एकूणच अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यासोबत एकत्रित सभा घेण्यास तयारी दाखवली आहे. राज ठाकरे हे आजच्या सभेत काय आवाहन करतात आणि वेळेच नियोजन कसं ठरतं यावर विचार करू, असेही अजित पवार म्हणाले

दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांचं दोन्ही काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतचं मत वैयक्तिक असून ती त्यांची इच्छा आहे. ते काँग्रेस मोठे नेते आहेत; पण आता निवडणुकीला सामोरं जाताना कुठलाही संभ्रम नको. राष्ट्रवादीचं अस्तित्व वेगळं असल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.