InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘सर्व चोरांचे नाव हे मोदीच कसे काय असू शकते?’, राहुल गांधींचा सवाल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. “सर्व चोरांचे नाव हे मोदीच कसे काय असू शकते?”, असा सवाल राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थितांना केला.

पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून देश सोडून पळून गेलेला नीरव मोदी आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांची नावं घेऊन राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. राफेल प्रकरणावरून देखील गांधींनी मोदींना लक्ष्य केले.

राहुल गांधी यांच्या या टीकेनंतर भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाचे दार ठेठावले आहे. भाजप नेत्यांनी याप्रकरणी राहुल गांधी लोकांचा जातीवरुन अपमान करत असल्याची तक्रार केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.