हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सचा पुरग्रस्तांकडे कानाडोळा का?

- Advertisement -
बॉलिवूडचे कलाकार किंग खान , भाईजान, बिग बी, देसी गर्ल अशी अनेक नावे आपल्या फेव्हरेट हिरो – हिरोईनला त्यांचे चाहते देत असतात. चाहते प्रेक्षक या कलाकारांवर भरपूर अगदी ओतपोत प्रेमाचा वर्षाव करतात. तसेच हे कलाकार सुद्धा ‘आम्ही तुमच्यामुळे इथपर्यंत पोहचलो’, ‘तुम्हीच आमचे मायबाप आहात’ असे अवॉर्ड्स घेताना सांगत असतात. मग ही आपुलकी ही भावना फक्त अवॉर्ड्स घेतानाच असते का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
Loading...
Related Posts
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पुरामुळे अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त झालेत. त्यांच्या मदतीसाठी सगळीकडून धावाधाव सुरू असताना हिंदी चित्रपटसृष्टीतील तथाकथित सुपरस्टार हिरो मदतीसाठी का पुढे आले नाहीत?
Loading...
कोल्हापूर, सांगली पूराच्या हाहाकारामुळे अनेक कुटुंब उधवस्त झाली. या पूरग्रस्त कुटुंबियांसाठी हजारो मदतीचे हात पुढे आले. मुंबई, पुणे, ठाणे अशा काही ठिकाणी मदतकेंद्रे उभी करून नागरिकांनाही मदतीचं आवाहन केलं जातंय. मराठी चित्रपट महामंडळ, नाटय परिषद यांअंतर्गत अनेक मराठी कलाकार पुढे आले. मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनीही या पूरग्रस्त कुटुंबियांना मदत केली.
- Advertisement -
कोल्हापूर तर चित्रपटसृष्टीची जननी आहे आणि सांगलीची नाट्यपंढरी म्हणून ओळख आहे. विशेष म्हणजे अनेक हिंदी चित्रपटांचे शूटिंग याच ठिकाणी होते. पण त्यांचे दुर्दैव म्हणजे याच ठिकाणी पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात देण्यासाठी बॉलिवूडचे एकही कलाकार पुढे आले नाहीत.
अनेक सर्वसामान्य लोकदेखील आपल्या पोटाला चिमटा काढून आपआपल्या परिने मदत करताना दिसतायतं. मात्र अशावेळी बॉलिवूडचे तथाकथित हीरो मात्र मदतीसाठी पुढे येताना दिसत नाहीयेत. या कलाकारांची संवेदनशीलता महाराष्ट्राच्या जनतेप्रती नाही का ?