फडणवीसांना मुख्यमंत्री असल्यासारखं का वाटतं?, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं खरं कारण

मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर येथे मंदा म्हात्रे यांनी महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन…हा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांचा डायलॉग चांगलाच गाजला होता.

या कार्यक्रमात ते बोलताना म्हणाले होते कि, तुमच्यासारखे नेते माझ्या पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही, असं जाहीर विधान फडणवीसांनी यावेळी बोलताना केलं होत. अशातच आता फडणवीस यांच्या वक्तव्यांवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहेत.

मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याची पाठराखण केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा नेहमीप्रमाणं चुकीचा अर्थ लावला गेला आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की, राज्यातील जनता अजूनही मी मुख्यमंत्री असल्याप्रमाणेच माझ्याकडून अपेक्षा करते. मराठवाडा दौऱ्यामध्ये फडणवीस यांना तसं जाणवलं होतं. गावागावातील लोक म्हणत होते की, साहेब तुम्ही मुख्यमंत्री पाहिजे होता. त्यामुळंच फडणवीस यांना लोकांमध्ये गेल्यावर मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं वक्तव्य केलं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा