जनतेचे आशीर्वाद कशाला हवेत, जनतेचा जीव धोक्यात घालायला?; उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसात नारायण राणे विरुद्ध शिवसेना या विषयावरुन राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणाला आज एक आठवडा पूर्ण झाला असला तरी शाब्दिक युद्ध सुरूच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिशन ऑक्सिजन अंतर्गत ठाणे शहरासाठी कायम्वरूपी ऑक्सिजन प्लांटचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जन आशीर्वाद यात्रेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली.

यावर आता मुख्यमंत्र्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोनाचे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही, हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. आम्ही जनतेसाठी नविन काही योजना करणार नाहीत. पण, त्यांचे जीव कसे धोक्यात येतील, असे सणसमारंभ साजरे करायचे आहेत. कारण काय तर, आम्हाला जनतेचे आशीर्वाद पाहिजेत. कशासाठी पाहिजेत आशीर्वाद, जनतेचे जीव धोक्यात घालण्यासाठी, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे, असा टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि मनसेला लगावलाय.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा