“मला कोणी खूर्ची देतं का खूर्ची” अशी अवस्था फडणवीसांची झालीये; संजय राऊतांचे टीकास्त्र

मुंबई : सध्या गोवा विधानसभा निवडणुकीवरून गोव्यासह महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक शाब्दिक युद्ध सुरू आहे. आम्हाला नटसम्राट म्हटल्याचा आम्हाला आनंद, पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही असा सणसणीत टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
तसेच पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले कि, गोव्याला रंगभूमीचा खूप मोठा वारसा आहे. नटसम्राटाचा महाराष्ट्राला मोठा वारसा आहे. महाराष्ट्रातले सर्व नटसम्राट हे गोव्यातून गेले आहेत. संगीत, कला, नाट्य ही गोव्याची भूमी आहे. फडणवीस गोव्याच्या जनतेचा, नाट्यकर्मींचा अपमान करतात. नटसम्राटमध्ये एक वाक्य आहे, कोणी मला घर देता का घर घर. अगदी तशीच फडणवीसांची अवस्था आहे.
कोणी मला खुर्ची देता का खुर्ची अशी फडणवीसांची अवस्था आहे. नटसम्राट म्हटल्यानं मला वाईट वाटलं नाही. आम्ही रंगभूमीचे उपासक आहोत. मला आनंद आहे, की त्यांनी नटसम्राट म्हटलं. पण, आम्ही शब्द फिरवणारे सोंगाडे नक्कीच नाही”, असं जोरदार उत्तर राऊतांनी दिलं.
महत्वाच्या बातम्या
- गोव्यात आमच्याशिवाय सरकार बनणार नाही; संजय राऊतांच मोठं वक्तव्य
- “मुख्यमंत्री म्हणायचे निवडणुका एकत्र लढू”; अजित पवारांनी सांगितले नगरपंचायतीचे राजकारण
- रोहित पाटलांनी विरोधकांना पाजलं पाणी! चित्रा वाघ ट्वीट करत म्हणाल्या, “आज आबा असते तर…”
- “आजच्या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेस ठरला राज्यातील नंबर एकचा पक्ष”
- शिवसेनेच्या आमदाराने मारलं कोरेगावचे मैदान; शशिकांत शिंदेंना तिसऱ्यांदा पराभवाचा धक्का