देशात गांधींचा सर्वात उंच विशाल पुतळा का नाही?; थरूर यांचा भाजपला सवाल

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र ंनी लोकार्पण केल्यानंतर काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरदार पटेल हे महात्मा गांधींचे शिष्य होते. शिष्याचे स्मारक झाले. मग ाला सरदार पटेल यांचे गुरु असलेल्या महात्मा गांधी यांचा सर्वात उंच पुतळा का बांधता आला नाही, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.

सरदार पटेल यांच्या १८२ मीटर उंचीच्या पुतळ्याचे लोकार्पण बुधवारी पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर प्रकल्पाच्या जवळ हा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्यावरुन विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शशी थरुर यांनी तिरुअनंतपुरम येथील काँग्रेसच्या मेळाव्यात भाजपावर टीका केली. थरुर म्हणाले, देशात गांधींचा इतका विशाल पुतळा का नाही?. भाजपाने महात्मा गांधींचे सर्वात उंच स्मारक का बांधले नाही?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.