‘मेरी कोम’साठी मणिपुरी मुलीला का घेतले नाही? प्रियांका चोप्रा का? लिन लैशरामने केला संताप व्यक्त

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने काही वर्षांपूर्वी बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम हिच्या आयुष्यावर आधारित ‘मेरी कोम’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी प्रियांकाने बरीच मेहनत घेतली होती. प्रियांकाच्या या चित्रपटातील लुकची बरीच प्रशंसा झाली होती. परंतु आता अभिनेत्री आणि मॉडेल लिन लैशरामने प्रियांकाच्या चित्रपटातील कास्टिंगवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मेरी कॉम चित्रपटात प्रियांकला कास्ट केल्यामुळे लीन काही प्रश्न उपस्थित करत म्हणाली, “मला वाटते ‘मेरी कोम’ या चित्रपटाच्या पात्रानुसार चित्रपटात एखाद्या मणिपुरी मुलीला घेतलं जाऊ शकलं असतं. प्रियांकाने या चित्रपटासाठी खूप मेहनत केली आहे. ते मी नाकारत नाही. परंतु ‘द फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजमध्ये तमिळ भाषा बोलणाऱ्या कलाकारांना कास्ट केलं गेलं. ही पद्धत सगळ्यांना आवडली देखील. परंतु अशात जेव्हा उत्तर-पूर्वेकडील व्यक्तींवर चित्रपट बनवायची वेळ येते तेव्हा तिथल्या स्थानिक कलाकारांची निवड का होत नाही? असं का?”

पुढे लीन म्हणाली, “जर प्रेक्षक दाक्षिणात्य संस्कृतीला इतकं महत्व देतात मग तेच महत्व उत्तर-पूर्व संस्कृतीला का मिळत नाही? अनेकदा तर काही लोकांनी मला करोना व्हायरस या नावाने हाक मारली आहे. आम्हीही याच देशातील आहोत याचा सगळ्यांना विसर पडला आहे का?” असे बोलून लिनने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा