‘धरणात मुतण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांना राणेंचं अरे-तुरे इतके का झोंबावं?’

मुंबई : नारायण राणे यांनी अलीकडंच कोकणातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. हा दौरा राणेंच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळं गाजत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत सांगू पाहत असताना, ‘सीएम, बीएम गेला उडत’ असं म्हणत राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना खडसावलं. ‘मी इथं बाजारपेठेत उभा आहे. तुमचा एकही माणूस आमच्यासोबत नाही,’ असं राणे म्हणाले.

यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. काही नेते पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. जिल्हाधिकारी कुठे आहेत? तहसीलदार कुठे आहेत? विचारत आहेत. हे लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी? असा टोमणा पवारांनी नाव न घेता नारायण राणे यांना मारला होता.

यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. ‘धरणात मुतण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांना नारायण राणेंचं अरे-तुरे इतके का झोंबावं?’ असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा