“…हीच का उपकाराची परतफेड?”; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

सिंधुदुर्ग : राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. मात्र असे जरी असले तरी अद्यापही सिंधुदुर्ग जिल्हा हा रेड झोनमध्ये आहे. यावरून भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल आहे.

“सिंधुदुर्ग-रत्नागिरीने शिवसेनेला स्थापनेपासून साथ केली, त्याबदल्यात शिवसेनेने करोना काळात सिंधुदुर्गात ९०१ तर रत्नागिरीमध्ये १५६१ मृत्यू दिले. याला संपूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत. अशी राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर थेट टीका केली आहे.

तसेच, “दोन्ही जिल्ह्यात डॉक्टर नाही, नर्स, वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पदरी मृत्यू. मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड?” असा सवाल देखील राणेंनी विचारला आहे.

या अगोदर बुधवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नारायण राणेंची भेट घेतली होती, तेव्हा त्यांच्यात सिंधुदुर्गमधील करोना परिस्थितीसह अन्य मुद्यांवर बराचवेळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा