डिंपल कपाडिया यांच्या अभिनयाला का बसला होता 10 वर्षाचा ब्रेक? चला पाहूया

मुंबई : अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा आज वाढदिवस आहे. यांनी बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी अनेक खस्ता खाल्ल्या आहेत. आज वाढदिवसानिमित्त तिच्या फिल्मीकरियरची सुरुवात कशी झाली हे जाणून घेऊया.

बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा जन्म 8 जून 1957 मध्ये मुंबईतील गुजराती कुटुंबात झाला. वडील चुन्नीभाई कपाडिया एक उद्योजक होते. अभिनयात रुची असल्यामुळे वयाच्या 16 व्या वर्षीच डिंपलने अभिनय करायला सुरुवात केली. अभिनेता राजकपूर यांनी डिंपला सिनेमात पहिलीवहिली संधी दिली होती. 1973 साली ‘बॉबी’ या सिनेमातून डिंपल यांनी सिनेमात पदार्पण केले. पण यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून जवळ जवळ 11 वर्षचा ब्रेक घेतला. एवढा मोठा ब्रेक घेण्याचे कारण म्हणजे त्या काळचे सुपरस्टार अभिनेता राजेश खन्ना हे होते. ‘बॉबी’ सिनेमानंतर राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया सोबत विवाह केला होता.

मोठ्या ब्रेक दरम्यान डिंपल यांना ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या दोन अपत्यांना जन्म दिला होता. काही दिवसातच राजेश खन्ना आणि डिंपल यांच्यामधील नाते बिघडू लागल्यामुळे दोघेही काही काळाने वेगळे झाले. पण त्यांनी घटस्फोट घेतला नाही. बॉबी सिनेमा नंतर डिंपल कपाड़िया यांनी जख्मी शेर, एतबार, सागर, आखिरी अदालत, नरसिमाह, अजूबा, राम लखन, कॉकटेल,अंग्रेजी मीडियमसारखे अनेक सिनेमात काम केलं. 1993 मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘रुदाली’ हा डिंपल कपाडिया यांच्यासाठी म्हत्वपूर्ण ठरला होता.

महत्वाच्या बातम्

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा