InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

यूनिवर्सल बाॅस ख्रिस गेलचा नवा विक्रम

इंग्लड आणि वेस्ट इंडिज यांच्या मध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने वेस्ट इंडिजवर 29 धावांनी विजय मिळवला. या बरोबरच इंग्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.

इंग्लंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 418 धावां केल्या. त्यानंतर इंग्लंडच्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला वेस्ट इंडिजचा संघ 389 धावाच करू शकला व त्यांना 29 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव झाला असला तरीही ख्रिस गेलची खेळी सर्वाच्या लक्षात राहिली.

ख्रिस गेलने या सामन्यात तुफानी खेळी करत 97 चेंडूंमध्ये 14 षटकार व 11 चौकारांच्या साह्याने 162 धावा केल्या. या खेळीबरोबरच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा देखील पूर्ण केल्या. त्याचबरोबर गेलने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार ठोकण्याचा देखील विक्रम केला आहे. असा विक्रम करणारा गेल हा एकमात्र खेळाडू आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply