आदर पूनावाला यांना सुरक्षा देणार का? संजय राऊत म्हणाले…

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बरेच प्रयत्न करत आहेत. मात्र, शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र असेपर्यंत मविआ सरकार पडणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केला.“तुम्ही पंढरपूरमध्ये भाजपला साथ द्या…मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करतो.” असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरातील प्रचार सभेत केले. त्यानंतर भाजपने मविआतील तिन्ही पक्षांना धोबीपछाड देत पंढरपूरची निवडणूक जिंकली.

यामुळे भाजप पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या दोघांनी यासंदर्भात भाष्य करणे टाळले. मात्र, देवेंद्र फडणवीस बोलत असेल तर त्यामध्ये तथ्य असेलच, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे ‘ऑपरेशन लोटस’ चर्चेला सुरुवात झाली होती.आज हसन मुश्रीफ यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले. भाजप स्थापनेपासूनच महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत सरकारला काही होणार नाही. आघाडीचे हे सरकार पुढील २५ वर्षे चालेल, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.