‘अजित पवारांना मुख्यमंत्री करणार का?’, शरद पवार म्हणतात…

पिंपरी चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर छापे का पडत आहेत, यावर अनेक चर्चा रंगल्या आहे. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होण्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणा छापे टाकत आहेत का? असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकारांनी आज विचारला. त्याला पवार यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले.

शरद पवार म्हणाले कि, महाविकास आघाडीच्या सरकारचे नेतृत्व शिवसेनेकडेच राहणार. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. केंद्र सरकारने कितीही छापे टाकावेत, हे सरकार झुकणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे नेतृत्व करण्यास तयार नव्हते. आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला संधी द्यावी म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला, असं शरद पवार म्हणाले आहेत. आघाडी सरकार बनवण्यात माझाही सहभाग होता, असंही शरद पवार म्हणाले आहेत. सरकार तयार होताना मुख्यमंत्री शिवसेनाचा होईल हे सर्वानी एकमताने मान्य केलं होतं. असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा