‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोमधून ‘बबिता’ घेणार निरोप?

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. मात्र या मालिकेतील ‘बबिता’ हे पात्र साकरणारी अभिनेत्री म्हणजे मुनमुन दत्ता मालिका सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे नेमकी मुनमुन दत्ता कुठे गेली? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित होत आहे.

लॉकडाऊन दरम्यान राज्यात मालिकांचे शुटिंग पूर्णपणे बंद होते. यामुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे शूटिंग दमणमध्ये हलविण्यात आले होते. मात्र आता लॉकडाउनचे नियम शिथिल केल्याने मुंबईत शूटिंगला पुन्हा सुरूवात झाली आहे. मात्र शुटिंगला सुरुवात झाल्यापासून मुनमुन गायब आहे. अद्याप एकदाही ती सेटवर आली नाही. त्यामुळे तिच्या गैरहजेरीतही मालिकेचे शुटिंग सुरु आहे. यामुळे मुनमुन दत्ताने ही मालिका सोडल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र अद्यापही मूनमुनने यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी जातीवाचक शब्दांचा वापर केल्यामुळे मुनमुन दत्ता वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र कोर्टाने नंतर तिच्याविरोधात गुन्ह्याला स्थगिती दिल्याने तिने दिलासा व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा