“इथे बोलावले जाईल, त्या वेळेतच हजर राहायचं,” समीर वानखेडेंनी अनन्याला फटकारले

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे चौकशी केली जात आहे. मात्र काल अनन्या एनसीबी कार्यालयात तीन तास उशिरा पोहोचली. यामुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंनी अनन्याला चांगलंच फटकारलं आहे.

काल २२ ऑक्टोबरला एनसीबीने अनन्याला ११ वाजता एनसीबी ऑफिसमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र ती एनसीबी कार्यालयात दुपारी २ वाजता पोहोचली. तिला त्या ठिकाणी पोहोचण्यात ३ तास उशीर झाला. यानतंर समीर वानखेडे तिच्यावर चांगलेच भडकले. यावेळी समीर वानखेडेंनी अनन्याला खडेबोल सुनावले.

समीर वानखेडेंनी अनन्याला उशिरा येण्याचे कारण विचारले. त्यानंतर ते म्हणाले, “आम्ही तुम्हाला ११ वाजता बोलवलं होते आणि तुम्ही आता येताय. अधिकारी तुमच्यासाठी बसलेले नाहीत. हे तुमचे प्रोडक्शन हाऊस नाही. हे एनसीबीचे मध्यवर्ती कार्यालय आहे. या ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेत बोलावले जाईल, त्याच वेळेतच हजर राहा,” असे समीर वानखेडेंनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा