शिवसेनेसोबत पुन्हा युती शक्य आहे का?, देवेंद्र फडणवीस म्हणाले….

“शिवसेनेसाठी आम्ही कधीच दरवाजे बंद केले नव्हते,” असं सूचक वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत पुन्हा युती शक्य आहे का या प्रश्नाला उत्तर देताना केलं आहे. मात्र त्याचवेळी “आम्ही दरवाजे खुले असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला आवश्यकता नाही असं म्हटलं तर ते मान्य नाही. कारण आम्ही काय रस्त्यावर पडलेलो नाही,” असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आत्मसन्मानाला धक्का लागू न देता पुन्हा एकदा युती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असेच संकेत फडणवीस यांनी दिले आहेत.

भाजपाची दारं शिवसेनासाठी उघडी आहेत का? असा सवाल या मुलाखतीमध्ये फडणवीस यांना विचारण्यात आला असता त्यांनी थेट हो किंवा नाही असं उत्तर देणं टाळलं. “राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. पण याचा विचार शिवसेनेला करावा लागेल. कारण भाजपाने नाही तर शिवसेनेनं युती तोडली आहे. भाजपा गेला दूर नाही तर शिवसेना दूर गेली. भाजपाने सरकार तयार केलं नाही तर शिवसेनेनं तयार केलं आहे. त्यामुळे हा निर्णय शिवसेनेला करावा लागेल. आम्ही कधी दरवाजे बंदच केले नव्हते. पण आज आमचे दरवाजे खुले आहेत असं म्हणून मग त्यांनी परत त्याच्यावर म्हणायचं आम्हाला आवश्यकता नाही. तर आम्ही काही रस्त्यावर पडलेले नाही,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.