InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार; भाजपाची 21 जुलैला महत्त्वपूर्ण बैठक

- Advertisement -

येत्या ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभेचे लवकरच बिगुल वाजणार असून भाजपाची विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. त्या पार्ष्वभूमिवर मुंबतील गोरेगाव येथे असलेल्या नेस्को संकुलात 21 जुलै रोजी भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल.

या बैठकीत राज्यभरातील भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचीही शक्यता आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीपुर्वी शिवसेना आणि भाजपा युती झाली. युतीनं राज्यात घवघवीत यशदेखील मिळवलं. आता विधानसभेतही युती भक्कमपणे लढणार असल्याचे युतीच्या दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार असून 220 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवू, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला होता

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.