धनंजय मुंडे खरचं राजीनामा देणार ? स्वतः मुंडेंनी केला मोठा खुलासा

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याची बातमी समोर आली. २००६ सालापासून धनंजय मुंडे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते अशी तक्रार ओशिवरा पोलिस ठाण्य़ात रेणू शर्मा या महिलेने केली होती. यानंतर विरोधकांकडून मुंडेंवर टीका आणि त्यांच्या राजीनामा याबाबत वक्तव्य केली जात आहेत.

यावर आता खुद्द धनंजय मुंडे असं म्हणाले की, माझ्याकडे राजीनामा मागितला नाही आणि मी राजीनामा दिला नाही. तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याचा विषय माझ्यापर्यंत आला नाही असे म्हटले. त्यामुळे तुर्तास तरी या विषयाला राष्ट्रवादीकडून पुर्णविराम लागला आहे.

दरम्यान, “धनंजय मुंडे यांनी स्वत: माझी भेट घेतली आहे. मला भेटून एकंदर त्यांच्यावरील आरोपाची सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यानंतर काही तक्रारी झाल्या. त्याबाबत चौकशी सुरु झालेली असेल. हे प्रकरण इथपर्यंत येईल, व्यक्तिगत हल्ले होतील असा अंदाज त्यांना असावा. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात यापूर्वीच आपली भूमिका मांडली आहे”, असंही शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.