एकनाथ खडसे रामराजेंच्या भेटीला, मतांचा कोटा बदलणार?

मुंबई : राज्यसभेच्या अनपेक्षित विजयानंतर आता भाजपचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. सहाव्या जागेसाठी झालेल्या लढतीत भाजपने सेनेचा पराभव करत विजय मिळवला. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपचे ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राज्यसभेतील पराभवानंतर आता विधान परिषदेसाठी आघाडीने कंबर कसली आहे. यादरम्यान या विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी रणनीती ठरली असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. अपक्षांना काही लोकांनी फोन केला, संख्या कमी पडत असल्याने अपक्षांना मदतीसाठी फोन केल्याचे पवार यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार निवडून आणण्याची जबाबदारीही दादांवरच आहे. सध्याचं संख्याबळ पाहता रामराजे नाईक-निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा राष्ट्रवादीकडे आहे. मात्र एकनाथ खडसे यांचं पारडं अगदी कट-टू-कट आहे. त्यामुळे मतं फुटल्यास खडसेंना त्याचा थेट फटका बसू शकतो. दरम्यान सर्व पक्षांचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत.

यातच आता राष्ट्रवादीने नेते एकनाथ खडसे हे सभापती रामराजे निंबाळकर यांची भेट घेणार आहेत. खडसे अचानक रामराजेंची भेट घेणार असल्याने राष्ट्रवादीतून नव्या समीकरणांची जुळवाजुळव होण्याची शक्यता वाढली आहे. आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची ट्रायडेन्ट हाॅटेलला बैठक होणार आहे. त्याआधीच खडसे आणि रामराजेंची भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा