प्रत्येकाला जिल्ह्यात आणण्यासाठी मदत करणार : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

स्थलांतरितांना आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू

जिल्ह्याबाहेरील नागरिकांनी संयम ठेवावा

चंद्रपूर, दि 1 मे : राज्य शासनाने 30 एप्रिल रोजी राज्याबाहेरच्या व राज्यातील इतर ठिकाणच्या नागरिकांना जिल्ह्यामध्ये आणण्याची परवानगी दिल्यानंतर प्रशासन गतीने कामी लागले आहे. ही प्रक्रिया आणखी काही दिवस चालणार असून नागरिकांनी एकाच वेळी गोंधळ न करता ज्या जिल्ह्यात अडकून पडले आहेत त्या जिल्ह्याच्या प्रशासनाची संपर्क साधण्याचे आवाहन पालकमंत्री  विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

Loading...

अन्य राज्यात अडकून पडलेल्या मजूर, श्रमिक, विद्यार्थी, प्रवासी, व्यापारी, सर्वांनाच जिल्ह्यांमध्ये आणण्यासाठी जिल्हा प्रशासन शासनाने सांगितल्याप्रमाणे रणनीती आखत आहे. प्रत्येक नागरिकाला जिल्ह्यात आणण्यासाठी मदत केली जाईल.  प्रत्येकाला जिल्ह्यामध्ये परत आणले जाईल. यासाठी जिल्हा प्रशासना सोबतच आपली यंत्रणादेखील काम करत असून पालकमंत्री समन्वय कक्षाची आजपासून स्थलांतरासाठी सुरुवात करत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

बाहेर जिल्ह्यात राज्यात ओळखलेल्या नागरिकांनी ज्या जिल्ह्यात ते अडकले आहेत. त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची तालुका प्रशासनाची संपर्क साधणे आवश्यक आहे. ज्या जिल्ह्यात यात अडकून पडलेल्या आहात त्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने ते चंद्रपूर जिल्ह्याशी संपर्क साधला जाणार आहे. त्याचप्रमाणे या जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांबाबतही अन्य राज्यांना व जिल्ह्यांना माहिती प्रशासनामार्फत दिली जात आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वप्रथम ते ज्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्या प्रशासनाकडे आपली माहिती द्यावी, असे आवाहन पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केले आहे.

ज्या जिल्ह्यात या ठिकाणी अडकले आहेत. त्या प्रशासनाला माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडून प्रवास करण्याविषयी परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याठिकाणी वैद्यकीय तपासणी देखील प्रवाशांची केली जाणार आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे प्रवासाची परवानगी मिळणार आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून  24 तास संपर्क करण्यासाठी हेल्पलाइन नंबर जाहीर केले आहेत. जिल्हा प्रशासनाने यासाठी 5 दूरध्वनी लाईन सुरू केल्या असून 07172-274166,67,68,69,70 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.तसेच सोबतच राज्यातील पुणे-मुंबई व इतर शहरांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी वरील क्रमांकावर आपली माहिती देण्याचे स्पष्ट केले आहे.

पालकमंत्री समन्वयन कक्ष दरम्यान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विशेष कार्य अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या मुख्य समन्वयात ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, बल्लारपूर, पोंभुर्णा या 5 तालुक्यांसाठी श्री. प्रदीप गद्देवार (8007203232) मुल नागभीड राजुरा कोरपना चिमूर या तालुक्यांसाठी श्री. उमेश आडे (9404235449) चंद्रपूर, वरोरा, जिवती,गोंडपिंपरी,भद्रावती तालुक्यासाठी श्री. सुधीर पंदीलवार (9175991100)  यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.