हिना खान लवकरच झळकणार साऊथमधील ‘या’ सुपरस्टार सोबत?

मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलता हैं’ फेम अभिनेत्री हिना खानने छोट्या पडद्याबरोबरच बॉलिवूडमध्ये सुद्धा आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच ती साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हिना खान साऊथचा सुपरस्टार प्रभास सोबत ‘वृंदावन’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. हिना खान अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत असून तिचा आता पर्यंतचा प्रत्येक शो सुपर हिट ठरला आहे. तसंच प्रभासने देखील अनेक लोकप्रिय चित्रपटात काम केले आहे.

दरम्यान हिना खान सोशल मीडियावर सक्रिय असते आणि ती तिच्या व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून आपले मत स्पष्टपणे मांडताना दिसते. काही दिवसांपूर्वी हिना खानचा साडीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होता. यात हिना खान मेकअप करताना दिसून येते होती. तिच्या या बोल्ड अंदाजातील व्हिडिओमुळे हिनाला ट्रोल केलं जातं होते.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा