InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

विंडीज दौऱ्यापूर्वी कोहली पत्रकार परिषद घेणार नाही?

- Advertisement -

विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलमधील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि उप कर्णधार विराट कोहली यांच्यात मतभेद असल्याचे वृत्त पसरले होते. बीसीसीआयने हे वृत्त फेटाळून लावल्यानंतर रोहित शर्मासोबत मतभेद असल्याच्या चर्चेमुळे विराट कोहलीने विंडीज दौऱ्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधणे टाळल्याचे बोलले जात होते. मात्र, बीसीसीआयच्या सूत्रांनी कोहली या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ सोमवारी रवाना होणार आहे. याच दिवशी कर्णधार विराट कोहली एका प्रमोशनमध्ये दिसणार असून त्यानंतर तो विंडीज दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्यामुळे विंडीज दौऱ्यापूर्वी पत्रकार परिषद का बोलावली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विंडीज दौऱ्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषद घेणार नाही. आम्ही पत्रकार परिषद घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण ते शक्य झाले नाही. असेही सांगण्यात आले होते. मात्र, बीसीसीआयने नंतर याचे खंडन करत कोहली या पत्रकार परिषदेला उपस्थित राहाणार असल्याचे सांगितले आहे.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.