दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता महेश बाबूचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतो. महेश बाबूने आता बॉलीवूडमध्ये देखील यावे असे चाहत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान नुकतच महेश बाबू बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चावर आता एका मुलाखतीमध्ये महेश बाबूने वक्तव्य केले आहे.

महेश बाबूला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बॉलिवूड पदार्पणावर प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तो म्हणाला, ‘मी नेहमीच योग्य वेळी योग्य चित्रपट करण्याचा प्रयत्न करतो. जर राजामौली यांचा हा हिंदी चित्रपट असता आणि मला जाणवले असते की ही योग्य वेळ आहे तर मी चित्रपट साइन केला असता. माझा आगामी चित्रपट एस एस राजमौली यांच्यासोबत आहे आणि हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.’

प्रभास, धनुष आणि विजय देवरकोंडा हे दाक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे आता मेहश बाबू बॉलिवूडमध्ये कधी दिसणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा