InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

नारायण राणे आणि राज ठाकरे हे दोन नेते आगामी काळात एकत्र येणार?

- Advertisement -

कोकणातील पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी महाराष्ट नवनिर्माण सेना आंदोलन करणार असून या आंदोलनास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राणे आणि राज ठाकरे हे दोन नेते आगामी काळात एकत्र येणार का, याचीच चर्चा कोकणात सुरू झाली आहे.

मालवण येथील दैवज्ञ भवन येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यकारिणीची बैठक खासदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी राणे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून मी यशस्वी झालो, मात्र सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलो तरी मागच्यावेळी यशस्वी होऊ शकलो नाही, ही दु:खाची बाब आहे. मागील निवडणुकीत वैभव नाईक यांनी केलेला पराभव मी विसरू शकत नाही.

१९९० पासून मला ८० टक्केच्यावर मताधिक्य मिळायचे. मात्र लोकसभा निवडणुकीत मताधिक्याची टक्केवारी घसरली असून महिन्याभरात सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागून मतांची ८० टक्के मतांची तजविज करावी, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.