InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘गडकरी साहेब, मोदींना कधी, कुठे आणि कुठल्या चौकात ठोकून काढणार?’

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकलूज येथील सभेमध्ये मी खालच्या जातीचा असल्याने विरोधक अनेकदा माझ्यावर टीका केल्याचा आरोप केला. मोदी यांच्या या टिकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याच्या आधारे मोदींना खोचक टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत मोदींना टोला लगावला आहे. नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात ‘जो जातीचं नाव काढेल त्यांना मी ठोकून काढेल’ असंही म्हटलं होतं.  याच वक्तव्याचा आधार घेत, राष्ट्रवादीने ट्विट केले आहे. राष्ट्रवादीने ट्विट केले की, ‘गडकरी साहेब, कुठे?, कधी? कुठल्या चौकात?’ असा सवाल नितीन गडकरींना केला आहे. जातीवरुन राजकारण करणाऱ्या मोदींनी गडकरी कुठे? कधी? आणि कुठल्या चौकात फोडून काढणार असा सवालच राष्ट्रवादी काँग्रेसने गडकरींना केला आहे.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.