InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आता रोहित शर्मा मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम मोडणार का?

- Advertisement -

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या सामन्यात ठोकलेल्या शतकानं रोहितने एकाच विश्वचषकात सर्वाधिक शतकं करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. एकाच विश्वचषकात सर्वाधिक चार शतकं झळकावण्याचा विक्रम आजवर श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर होता. या विक्रमाशी रोहितने बरोबरी केली.

आता रोहित मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम मोडेल का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. विश्वचषकातल्या सर्वाधिक शतकांच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. मास्टर ब्लास्टरच्या नावावर विश्वचषकात सहा शतकं आहेत. टीम इंडियाचा अजून एक साखळी सामना बाकी आहे. सोबतच बांगलादेशविरुद्ध विजय मिळवत टीम इंडियाने सेमी फायनलचं तिकीट देखील फिक्स केलं आहे. त्यामुळे रोहितला सचिनचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.