समीर वानखेडेंची चौकशी करणार का?; दिलीप वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य

पुणे : सध्या राज्यात मुंबई ड्रग्सप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जाहीर कार्यक्रमात आव्हान दिले आहे. वर्षभरात समीर वानखेडेला तुरुंगात पाठवणार, तुझी नोकरी जाणार, तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असे आव्हान मलिक यांनी जाहीर कार्यक्रमात दिले.

राज्याची जनता हे सर्व पहात आहे, तुझी बोगसगिरी जनतेसमोर आणणार त्याच्या घरातले सगळे बोगस आहेत. तुला तुरुंगात टाकल्या शिवाय मी गप्प बसणार नाही, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला आहे. यानंतर राज्य सरकार समीर वानखेडेंविरोधात कारवाई करणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आता यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य सरकारकडून समीर वानखेडेंच्या चौकशीचे आदेश देण्याचा प्रश्न उदभवत नाही. ते केंद्र सरकारच्या यंत्रणेमधून काम करत आहेत. तसेच नवाब मलिक यांनी नेमकं काय विधान केलं, याबाबत मला फारशी माहिती नाही, असं दिलीप वळसे पाटलांनी म्हटलंय. त्यांनी यासंदर्भात अद्याप कुठलेही पुरावे माझ्याकडे दिलेले नाहीत. मी त्यांच्याकडून माहिती घेईन. मात्र सध्यातरी मला याबाबत काही माहिती नाही, असं वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा