दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार?

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी ऑनलाईन पद्धतीने होणार नसून तो षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. हा मेळावा महत्त्वाचा आहे याचं कारणही तसंच महत्त्वाचं आहे कारण या दसरा मेळाव्यात आणखी एका ठाकरेचं लाँचिंग केलं जाण्याची शक्यता आहे. ठाकरे घराण्याची तिसरी पिढी आदित्य यांच्या रुपाने राजकारणात सक्रीय झाली आहे.

यानंतर आता आदित्य ठाकरेंचे लहान भाऊ तेजस यांनीही युवासेनेत सक्रीय व्हावे, अशी इच्छा शिवसैनिकांची आहे. यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. त्यामध्ये तेजस ठाकरे युवासेनेत सक्रीय होतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीतल्या एका दसऱ्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांचं लाँचिंग झालं होतं. आता या दसरा मेळाव्यात आणखी तेजस ठाकरेंच लाँचिंग होणार आहे.

तसेच तेजस ठाकरे एकदा विचारले असता, त्यांना स्वत: राजकारणात येण्यात रस नसल्याचं त्यांनी एकदा सांगितलं होतं. त्यामुळे या दसऱ्या मेळाव्याला ते युवासेनेत प्रवेश करून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात करणार का? हे पाहावं लागणार आहे. याबद्दल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला विचारले असता, त्यांनी तेजस ठाकरे लवकरच पक्ष प्रवेश करतील, अशी माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा