राज्यातील महाविद्यालये सुरु राहणार कि बंद ?, यावर उदय सामंतांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

मुंबई : कोविडचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात धुमाकुळ माजवत आहे. सध्या देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. अशातच मुंबईत सध्या ५ हजार नवीन केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राची चिंता आता वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्यातील शाळा, कॉलेज पुन्हा बंद राहणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रातात ओमिक्रॉन दुप्पट वेगाने वाढत आहे. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला याचा विचार करावा लागेल. येत्या 3 तारखेला कुलगुरूंची एक बैठक होणार आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून जो अहवाल येईल. त्यावर मुख्यमंत्र्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, नव्या वर्षात राज्याला करोनामुक्त करण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलून दाखवला आहे. मात्र, रोजची रुग्णसंख्या आणि वाढीचा दर लक्षात घेऊन कठोर निर्बंधांबाबत निर्णय घेतले जातील, असे सूतोवाच अजित पवारांनी दिले आहेत. कोरेगाव भिमा येथे अजित पवार यांनी शहीदांना मानवंदना देण्यासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी अजित पवारांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या