सचिन तेंडुलकर यांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?, फडणवीसांचा सवाल

मुंबई : भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देश-विदेशातून पाठिंबा मिळत आहे, मात्र असं असलं तरी भारतातील काही सेलिब्रेटी तसेच क्रिकेटपटूंनी या आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे.

रिहानासह काही परदेशी सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात भाष्य केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिनवरून सरकारला सवाल केला आहे. भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडुलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

केरळ युवा काँग्रेसने सचिनच्या विरोधात त्याच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करताना त्याच्या पोस्टरला काळं फासलं. यासंदर्भातील फोटो सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा