InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कर्तव्यदक्ष तुकाराम मुंडे यांच्या बदलीचे सत्र थांबणार का?

कर्तव्यदक्ष व कठोर उपाय योजनाचे पालन करणारे नाशीक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्याचे सामान्यांना चर्चेद्वारे समजले मात्र त्यांची तेथूनही रुजू होण्या अगोदर राज्य सरकारने अवघ्या नऊ महिन्यात पुन्हा मुंबईतील नियोजन विभागाचे सहसचिव पदी बदली करण्यात आली आहे. बारा वर्षातील मुंडे यांचीही अकरावी बदली आहे. २०१६ पासूनची ही चौथी बदली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून भ्रष्ट व अवैध वाहतूक विरोधात यशस्वी मोहिम राबवली होती. मुंबई मनापा आयुक्त असतांना त्यांनी अवैध बांधकाम विरोधात जोरदार कारवाई केली होती.

तिथून त्यांची पुण्यात बदली झाली. पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदावर असतांना देखील त्यांनी धडाकेबाज निर्णय घेतले. त्यानंतर नाशिक महापालिका आयुक्त असतांना त्यांच्या निर्णयाची कारकिर्द योग्यच राहिली होती. कर्तव्यदक्ष व कठोर उपाय योजनेचे पालन करणारे त्यांच्या कार्यसेवेत सततचा हस्तक्षेप थांबवून बदलीचा निर्णय थांबण्याची मागणी चौथ्यांदा मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत दि.२८ नोव्हेंबर रोजी पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply