‘गाव जेवण एक दिवस देणार की तीन वर्षे?’; अशोक चव्हाणांचा खोचक सवाल

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. भाजपाने अनेक नेत्यांना देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उतरवले आहे. यासाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आगळीवेगळी ऑफर दिली. यावेळी ते देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक पूर्वतयारीसंदर्भात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

यापुर्वी सांगली महानगरपालिकेच्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला शॉक दिल्यास सोन्याचा मुकुट घालेन अशी ऑफर दिली होती. तर आता देगलूरमध्ये भाजपला आघाडी दिल्यास मी तुम्हाला गाव जेवण देईन अशी खुली ऑफर चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ही ऑफर दिली आहे.

आता चंद्रकांत पाटलांच्या या ऑफरचा काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी खरपूस समाचार घेतलाय. ‘जेवण एक दिवस देणार आहात की उर्वरित तीन वर्षे?’ असा सवाल चंद्रकांत पाटील यांना केला आहे. तसेच, चंद्रकांत पाटील यांच्या हातात काही नाही, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा